बाई बास करा आता !
शनिवारी 'नक्षत्रांचे देणे" ह्या कार्यक्रमाचा (२७ वा) आणि शेवटचा भाग पाहिला. आणि पुन्हा एकदा अनुराधा मराठेंचे गायन ऐकून वाईट वाटले.
बाईंचा आवाज पाSSSर गेलाय. नव्या को-या भांड्यांवर बोट फिरवल्यावर जसा च्यय्य्य्य्क आवाज येतो- तसा कानावर ओरखडे आणि अंगावर शहारे आणणारा आवाज झालाय. तो एकवेळ परवडला अशी सुरांची दुर्दशा झालीये. आवाज गेलाय हे (एक वेळ) मान्य केले तरी सूर कुठे गेले? बेसूर झालेल्या किती जागा दाखवाव्या? -हास , -हास म्हणतात तो हाच, याची पुन्हा एकदा खात्री पटली. ते भीषण "परवशता पाश दैवे" तर जन्मात विसरणार नाही. अगदी त्यांचे पेटंट "लटपट लटपट"- पण आपटलं. बाई- खरंच कळकळून विनंती आहे- स्वरयंत्र जिथे वयानुरुप दस्तुरखुद्द लताबाईंचे झिजले आहे तिथे तुमची काय कथा? बास करा आता!! आणि हे आत्ताचे नाहीये. सुधीर फडक्यांवरील नक्षत्रांचे देणेच्या भागातही त्या अनेक वेळा बेसूर झाल्यात. उदा-"मनोरथा चल त्या नगरीला".
ह्या कार्यक्रमात त्या कमी म्हणून की काय रविंद्र साठ्यांनी ही पाटी टाकली- आधीच तो सचिन करंबळेकर नावाचा ईसम उसनं अवसान आणुन लोकगीत म्हणत होता- साठ्यांनी जागा तर चुकवलीच पण तेही बे-सू-र झाले एका क्षणी.
चंद्रकांत काळे,नीना कुलकर्णी आणि विभावरी आपटेनी अब्रु सांभाळली. विभावरी आपटेनी ओम नमोजिआद्या, याला जीवन ऐसे नाव, आणि निळ्या आभाळी अप्रतिम सादर केलं. अनुराधा बाईंच्या पुढे तिचा आवाज कानात अमृत ओतल्यासारखा.
चंद्रकांत काळे मस्त!
कार्यक्रम संपल्यावर टाळ्या वाजवावश्या वाटल्या त्या "हुश्श!! संपला एकदाचा !" यासाठी. रविवारचा दुसरा भाग पाहण्याची हिम्मत केली नाही.

4 Comments:
At 2:54 am, Milind Phanse said…
१०० टक्के सहमत. ह्या मराठेबाईंना व साठेबुवांना कोणीतरी आवरा आता. पूर्वपुण्याईवर अजून किती काळ जगणार आहेत ही दोघं, कोण जाणे. 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सांप्रत कर्णबधीर झालेत अशी शंका येते. जरा ताज्या दमाच्या गायक-गायिकांना संधी द्या, म्हणावं.
At 1:00 pm, Anand Sarolkar said…
Did not see the last episodes but this used to be my favorite program...especially remember the episodes on Sudhir Phadke, Gadima and there was one children special in which atul purchure was there.
At 7:01 pm, Shimajiro said…
एकदम बरोबर. One and Only - शितल सेवेकरी. पण माझ्या आजुन लक्षात नाही आलं आपल्याला कुठे बघितलं ते??????
आणि जपानी च म्हणालात तर मला सुध्धा नंतर वाचताना अडचण येते. :-)
At 2:21 pm, HAREKRISHNAJI said…
100 % agreed. Good you pointed out.
Few years back my letter was published in Loksatta on Gunidas Samelan on similar topic about the Legends of India. I have stopped going to their performances and now I restricts myself only to young and much talented young generation's performances.
Puriyadhanashri is my favorite Raag.
Kaha Chala Ho Re Mukh Pherilo Piya
Re Aab Na Javo,Ruth KAr Ham san ||
Kachu Naa Kahi Maito, Janoo Na Janu Re
Sapane Me Kahi Ho TO Ruth Kar Ham San ||
Pt.Kumar Ghandharva.
http://harekrishnaji.blogspot.com/2007/01/img-janfest-2007.html
Post a Comment
<< Home